Showing posts with label News. Show all posts
Showing posts with label News. Show all posts

फेसबुक करणार राजकीय नेत्यांची फेक अकाऊंट बंद; पेज अॅॅडमीनचीही माहिती घेणार

Posted By: BUTIBORI.INFO - 07:28:00

फेसबुक डाटा लीक प्रकरणात एप्पलचे  सीईओ टिम कुक यांनी  मार्क झुगरबर्ग आणि फेसबुकवर टीका केली होती. ते म्हणाले कि, हे सर्व थांबवण्यासाठी फेसबुकने पूर्वीच अधिसूचना आणि अधिनियम करयाला हवे होते.  मार्क झुगरबर्ग ऐवजी तुम्ही असता तर काय केल असते? या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले ‘आम्ही अशी परिस्थिती कधीच निर्माण होवू दिली नसती, आम्ही ग्राहकाचा डेटा विकून करोडो रुपये कमवू शकलो असतो पण आम्ही तसं केल नाही.  कैम्ब्रिज एनालिटका डेटा लीक प्रकारणात फेसबुक यूजर्सच्या माहितीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केल्याचं निष्पन्न झाल आहे. त्यामुळे फेसबुकने डेटा सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलने गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला होता.
याच अनुषंगाने फेसबुकने आता मोठे फेरबदल करण्याचे ठरवले असल्याच चित्र दिसत आहे. भारतातील आणि इतर देशातील आगामी निवडणूक पाहता राजकीय नेत्यांचे  फेक अकाऊंट बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. तसेच मोठ्या पेजच्या अॅॅडमीनची पूर्ण ओळख आणि त्याबद्द्लची माहिती फेसबुक घेणार आहे.

take down thousands of fake accounts
If you’ve followed me for a while, you know one of my top priorities for 2018 in making sure Facebook prevents interference and misinformation in elections.
I’ve written about a number of the steps we’re taking — from building new AI tools to take down thousands of fake accounts to verifying every political advertiser and large page admin to launching industry-leading ads transparency tools.
Today we’re taking another step — establishing an independent election research commission that will solicit research on the effects of social media on elections and democracy.
The goal is both to get the ideas of leading academics on how to address these issues as well as to hold us accountable for making sure we protect the integrity of these elections on Facebook.
To do this, we’re working with foundations across the US to set up a committee of academic experts who will come up with research topics and select — through a peer review process — independent researchers to study them. We’ll give those researchers access to our resources so they can draw unbiased conclusions about Facebook’s role in elections, including how we’re handling the risks on our platform and what steps we need to take before future elections. They’ll share their work publicly, and we won’t require our approval to publish. You can find out more about their work and how any data we share with them will be protected here: newsroom.fb.com/?p=10426
Looking back, it’s clear we were too slow identifying election interference in 2016, and we need to do better in future elections. This is a new model of collaboration between researchers and companies, and it’s part of our commitment to protect the integrity of elections around the world. We’ll share more updates soon.

१ हजार ३४ कोटी रुपयांच्या कमाईसह भाजप सर्वाधिक श्रीमंत पक्ष; निवडणुकांवर खर्च केले तब्बल ६०६ कोटी

Posted By: BUTIBORI.INFO - 07:20:00

१ हजार ३४ कोटी रुपयांच्या कमाईसह भाजप सर्वाधिक श्रीमंत पक्ष; निवडणुकांवर खर्च केले तब्बल ६०६ कोटी

केंद्र सरकार तसेच देशातील बहुतांश राज्यात सत्ता असणारा भारतीय जनता पक्ष ( भाजप ) हा भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे. देशातील निवडणुका आणि राजकीय पक्षांच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफोर्म या संस्थेन २०१६ – १७ चा आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये १ हजार ३४ कोटी रुपयांच्या कमाईसह भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष बनल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१५ – १६ च्या तुलनेत भाजपचे उत्पन्न तब्बल ८१ टक्क्यांनी वाढले आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे उत्पन्न हे २२५ कोटी रुपये आहे.
निवडणुक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफोर्म या संस्थेन हा अहवाल बनवला आहे. दरवर्षी देशातील सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाला ऑडीट रिपोर्ट सादर करावा लागतो, हा रिपोर्ट सादर करण्याची ३० ऑक्टोबर २०१७ हि शेवटची तारीख असताना सत्ताधारी भाजपने तब्बल तीन महिने तर कॉंग्रेसने साडेतीन महिन्यांच्या उशिराने आपला ऑडीट रिपोर्ट सादर केला आहे.
२०१६ – १७ या आर्थिक वर्षात भाजपला तब्बल ९९७ कोटी रुपयांचे डोनेशन मिळाले आहे. तर कॉंग्रेसला मिळणाऱ्या डोनेशनचा ओघ कमी झाला असून पक्षाला केवळ ५० कोटी रुपयांचे डोनेशन मिळाले आहे.
भाजपने निवडणुकीवर केला ६०६ कोटींचा खर्च
२०१४ मध्ये भाजपा केंद्र सरकारमध्ये विराजमान झाली. त्यानंतर देशभरात झालेल्या बहुतांश निवडणुकांत पक्षाने विजय संपादन केले आहे. दरम्यान, १ हजार ३४ कोटींचे उत्पन्न असणाऱ्या भाजपने ६०६ कोटी रुपये निवडणुकांवर खर्च केले आहेत. तर विरोधीपक्ष कॉंग्रेसने १४९ कोटीं रुपये निवडणूकीवर खर्च केल्याच या अहवालात सांगण्यात आल आहे.
देशातील प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे उत्पन्न
भाजप – १ हजार ३४ कोटी
कॉंग्रेस – २२५ कोटी
बसपा – १७३.५८ कोटी
सीपीएम – १०० कोटी
राष्ट्रवादी कॉंग्रेस – १७
तृणमूल कॉंग्रेस – ६.३९ कोटी
सिपिआय – २ कोटी

अखेर बाबासाहेबांचा भगवा पुतळा झाला निळा !

Posted By: BUTIBORI.INFO - 07:15:00

https://mobile.twitter.com/ANINewsUP/status/983588508592943104/video/1

देशभरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार सुरु आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून राजकारण तापले आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने बी आर आंबेडकर ऐवजी भीमराव रामजी आंबेडकर असे पूर्ण नाव लिहिण्याच्या सूचना केली होती. त्यानंतर आता पुतळ्याचा रंगच बदलण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
https://mobile.twitter.com/ANINewsUP/status/983588508592943104/video/1


सरकारची मस्ती उतरवू – रविकांत तुपकर भाजपवाल्यांना पैशाचा माज आणि सत्तेची मस्ती चढली

Posted By: BUTIBORI.INFO - 07:01:00


सरकारची मस्ती उतरवू – रविकांत तुपकर

भाजपवाल्यांना पैशाचा माज आणि सत्तेची मस्ती चढली

या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी रात्रीच शहादा येथे धाव घेवून प्रकरणाची माहिती घेतली. व रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. दरम्यान, आज १० एप्रिल रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात येथील प्रांत कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे मोर्चा निघाला. या मोर्चात प्रामुख्याने युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, मराठवाड्याचे कार्यध्यक्ष गजानन बंगाळे, दिपक पगार, माजी मंत्री पदमाकर वळवी, राजेंद्र गावीत यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधीकारी व नेते उपस्थित होते. जवळपास १५ हजाराच्यावर शेतकरी सहभागी झालेला हा मोर्चा पाहून प्रशासनाला अक्षरशा घाम फुटला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या पाच दिवसात पुर्ण न झाल्यास महाराष्ट्र पेटवू असा ईशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.
सत्ताधारी भाजप सरकारवर आपल्या भाषणातून हल्लाबोल करताना तुपकर म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार सत्तेत आले त्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्या ऐवजी शेतकऱ्यांवरच निर्दयीपणे लाठीचार्ज करून शेतकऱ्यांचं रक्त सांडले, या भाजपवाल्यांना पैशाचा माज आणि सत्तेची मस्ती चढली आहे. मंत्र्यांना आता शेतकरी चुन-चुन के मारेंगे असा इशारा तुपकरांनी दिला. हिंमत असेल तर माझ्या छातीत गोळी घाला असे आव्हान तुपकरांनी दिले. रविकांत तुपकरांच्या या आक्रमक भाषणामुळे युवकांमध्ये प्रचंड जोष चढला होता. तुपकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या होत्या? तर आमच्या मालाला हमी भाव दया. हा हमीभाव देण्याऐवेजी सरकारच्या सांगण्यावरुन पोलीसांनी शेतकऱ्यांवर काठ्या चालविल्या. आता हा संघर्ष थांबनार नाही, या सरकारची मस्ती उतरविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी प्रांत कार्यालयात रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री पद्माकर वळवी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत रविकांत तुपकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. तुपकरांचा हा आक्रमक पवित्रा लक्षात घेता अधिकाऱ्यांनी त्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश काढले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील यांना निलंबित करावे व ३०७ प्रमाणे गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. यासंदर्भात तातडीने चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र आम्ही एवढ्यावरच थांबनार नाही या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन शेतकऱ्यांवर अमाणूषपणे लाठी हल्ला करणाऱ्या डिवायएसपी महारू पाटील यांना निलंबीत करुन इतरांवर पाच दिवसात गुन्हे दाखल करावे. या लाठीहल्यामागे सरकारचा हात आहे. असा आरोप तुपकरांनी केला. या प्रकरणी कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना महाराष्ट्रात फीरु देणार नाही असा सज्जड इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी सुध्दा शहादा शहर बंद ठेवून नागरीकांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठी हल्याचा निषेध केला. दोन दिवसात पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारीणीची बैठक ११ व १२ एप्रिल रोजी होऊ घातली असून या बैठकीत सुध्दा शहादा प्रकरणाचे पडसाद उमटणार असून महाराष्ट्रभर करण्यात येणाऱ्या आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीत ठरविण्यात येणार आहे. मोर्चात स्वाभिमानीचे नाशिकचे सोमनाथ बोराडे, मनोज भारतीय, विद्यार्थी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष पवनकुमार देशमुख, वसंत पाटील, कृष्णादास पाटील, सचिन पाटील, रविद्र पाटील, रत्नदीप पाटील, गणेश पाटील, निलेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहावीच्या पाठ्यपुस्तकातही भाजपने राजकीय स्वहित जोपासत केली अतिशोक्ती

Posted By: BUTIBORI.INFO - 06:55:00

विरोधकांवर साधला निशाणा

दहावीच्या पाठ्यपुस्तकातही भाजपने राजकीय स्वहित जोपासत केली अतिशोक्ती

काहीदवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दादरच्या शिवाजी मंदिरात दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणार असल्याचे तावडे म्हणाले होते. मात्र अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आलं आहे तर अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून राज्यशास्त्र हा विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप -शिवसेनेचे गोडवे तर विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातही भाजपने राजकीय स्वहित जोपासत अतिशोक्ती केल्याचे दिसून येत आहे. तसेच अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आपको भी लगता है बाइक चोरी होने का डर, तो उसमें फिट कर दें ये डिवाइस

Posted By: BUTIBORI.INFO - 09:34:00

आपको भी लगता है बाइक चोरी होने का डर, तो उसमें फिट कर दें ये डिवाइस
गैजेट डेस्क।इंडियन मार्केट में अब रियल टाइम मिनी ट्रैकिंग डिवाइस आ चुके हैं। ये डिवाइस कार, बाइक, फोन, बैग या अन्य किसी के साथ कनेक्ट होगा उसकी पोजिशन रियल टाइम में बता देगा। यानी अगर ये आपकी कार या बाइक से कनेक्ट है दिया और चोरी हो जाती है तो आप चोर तक बिना किसी मदद के पहुंच जाएंगे। इस नैनो डिवाइस का नाम Secumore है। इस डिवाइस को ऑनलाइन स्टोर से 1575 रुपए में खरीदा जा सकता है।
# बिना इंटरनेट करेगा काम
इस डिवाइस की खास बात है कि ये इंटरनेट या वाई-फाई कनेक्टिविटी के बिना काम करता है। यानी डिवाइस का ट्रैक करने की कोई लिमिट नहीं है। इसे भारत में कहीं भी आसानी से ट्रैक किया जा सकता है। दरअसल इस डिवाइस में एक नैनो सिम को इन्सर्ट किया जाता है और ऐप की मदद से इस डिवाइस को ट्रैक कर सकते हैं। इस डिवाइस की ऑनलाइन प्राइस 2,429 रुपए है, लेकिन डिस्काउंट प्राइस के साथ इसे 1575 रुपए में खरीद सकते हैं।

# डिवाइस में ये है खास
ये डिवाइस 2G GSM/ GPRS/ GPS, TCP/ IP नेटवर्क पर काम करता है। डिवाइस में रिचार्जेबल बैटरी है जिसका बैकअप लगभग 3 दिन है। ये वाटरप्रूफ है इसके लिए IP65 सर्टिफिकेट भी मिला है। इस डिवाइस में एक माइक्रोफोन भी दिया है। यानी डिवाइस जहां भी रहेगा वहां की बातें आप अपने फोन पर सुन सकते हैं। इतना ही नहीं, डिवाइस को SMS की मदद से भी कंट्रोल किया जा सकता है।






पाकिस्तानच्या गोळीबारात आज आपल्या महाराष्ट्राचे वीर सुपुत्र शुभम मस्तपुरे वय ( 20) यांना वीरमरण आले . त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Posted By: BUTIBORI.INFO - 09:19:00



💐💐💐पाकिस्तानच्या गोळीबारात आज आपल्या महाराष्ट्राचे वीर सुपुत्र शुभम मस्तपुरे वय ( 20) यांना वीरमरण आले .  त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

अॅट्रॉसिटी: शिवसेनेची मोदींवर टीकेची झोड

Posted By: BUTIBORI.INFO - 22:18:00
मुंबई : अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच सरसकट अटक करता येणार नाही, या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा अशी मागणी केंद्र सरकारने केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद' ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या सर्व प्रकरणी मौन बाळगणे पसंत केले आहे. याविरोधात भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गांधी, नेहरू जीवाची पर्वा न करता दंगलखोरांना सामोरे गेले होते, मोदी व त्यांच्या मंत्र्यांनी हेच करायला हवे होते अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालात आसनसोल येथे हिंदू व मुसलमानांत हिंसक दंगल उसळली आहे. रामनवमीच्या निमित्ताने भाजपसमर्थक संघटनांनी हाती नंग्या तलवारी परजवीत ‘जुलूस’ काढला व तेथूनच दंगलीला सुरुवात झाली. या दंगलीचे खापर ममता बॅनर्जी यांच्यावर फोडले जात असेल तर भाजपशासित राज्यात उसळलेल्या दंगलीस जबाबदार कोण? उन्मादाने सध्या देशात होळ्या पेटल्या आहेत आणि राज्यकर्ते मात्र कडीकुलुपात सुरक्षित बसले आहेत,' असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दै.'सामना'च्या अग्रलेखात मांडले आहे. देश एकदा धर्माच्या नावावर फुटला आता जातीच्या नावावर तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान मोदी कुठे आहेत, असा सवाल भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर देशभर अनेक ठिकाणी उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा देश जातीय फाळणीच्या दरीत कोसळेल अशी भीती या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
गुजरात हे पंतप्रधानांचे राज्य आहे. ओडिशा व पंजाब वगळता दंगली उसळलेल्या राज्यांत भारतीय जनता पक्षाची सरकारे आहेत.
दंगल भडकवून समाजात फूट पाडायची. मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकायच्या हा राजकीय भ्रष्टाचार आहे. नीरव मोदीने देश लुटला. पण आताचे राजकारणी देश तोडत आहेत.
देशाचे राजकारण भयंकर वळणावर उभे आहे. द्वेषाचे राजकारण देशाला एकसंध ठेवू शकणार नाही. भारतरत्न डॉ. आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत. त्याच ‘घटने’नुसार न्यायालये काम करीत आहेत. पण न्यायालयांनी निर्भीडपणे व निःपक्षपातीपणे काम करू नये अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत असेल तर येणारा काळ कठीण आहे.
 दलितांवर अन्याय नकोच, 

असेही धाडस! रूपालीने पळवून लावला वाघ; भंडारा जिल्ह्यातील घटना

Posted By: BUTIBORI.INFO - 21:11:00
असेही धाडस! रूपालीने पळवून लावला वाघ; भंडारा जिल्ह्यातील घटना

एका तरूणीने हिंमतीच्या बळावर जंगलाच्या राजाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे.
भंडारा : मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने माणसासारखा हंबरडा फोडला. काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. कुठेही काहीच दिसले नाही, पण शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तरूणी मागे वळली. एवढ्यात कुणाची तरी सावली तिला दिसली. तरूणीने पुन्हा दाराकडे वळून बघितले. समोर साक्षात जंगलाचा राजा ऐटीत उभा. क्षणाचाही विलंब न लावता वाघाने तरूणीवर हल्ला चढविला. दोघांच्या झुंजीत विजय शेवटी तरूणीचा झाला.
ही कुठल्या एका चित्रपटातील ‘स्टोरी’ नव्हे तर एका तरूणीने हिंमतीच्या बळावर जंगलाच्या राजाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे. या हल्ल्यात रूपाली व तिची आई जखमी झाली. जिजाबाई स्वस्थ असून रूपालीवर मात्र नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
२४ मार्च २०१८च्या मध्यरात्रीच्या सुमारस हा घडलेला थरारक प्रकार रूपाली आजही निर्र्भयतेने सांगते. वाघाने हल्ला चढविताच रूपालीच्या डोक्यावर, कमरेवर दोन्ही हात व पायावर जबर दुखापत झाली. रक्ताची धार वाहू लागली. काय करावे, सुचेना. पण लढण्याची हिंमत कमी होत नव्हती. वाघ दिसताच भल्यांभल्याची दातखीळ बसते. पण रूपाली विचलीत झाली नाही. वाघाला प्रतिउत्तर देत असतानाच आई जिजाबाईनेही काठीने वाघावर प्रहार केला. यात वाघाने जिजाबाईवरही हल्ला केला. हिंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावायचंच, असा चंग बांधून रूपालीने पुन्हा त्याच्यावर प्रहार केला. या प्रहाराने वाघाच्या मनात भीती आली असावी आणि क्षणार्धात त्याने तिथून धूम ठोकली. या ठिकाणी घरे दूरवर असल्याने आवाजही शेजाऱ्यांना पोहचेना. वाघाने पळ काढल्यानंतर दरवाजा बंद केला. रक्ताच्या थारोळ्यात असतानाही हिंमतीने रुपालीने मोबाईलवरून फोन करून घडलेली घटना कळविली..
दोघींनाही लगेचच उपजिल्हा रूग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. रूपालीला गंभीर दुखापत असल्याने तिला नागपूर येथील मेडिकल कॉलेजला ‘रेफर’ करण्यात आले. घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी वनविभागातर्फे या मायलेकींना आर्थिक मदत मिळालेली नाही. हातात जेवढी रक्कम होती खर्च झाली. औषधोपचाराला पैसा लागत नाही. पण इतर खर्च पूर्ण करण्यासाठी अंगावरील सोने-चांदीचे खळेही मेश्राम यांनी विकले. घरात अठराविश्व दारिद्रय. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या रूपालीला या घटनेने बळ जरूर दिले, पण आर्थिक मदत मिळालेली नाही.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा

Posted By: BUTIBORI.INFO - 05:56:00
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा दि. 28/03/18 बुधवार,शाम 05 बजे
 कार्यकर्ता मेळावा का आयोजन किया गया है. 
 👉ठिकान 👈
स्वर्गीय किशोर भाऊ वानखेडे सांस्कृतिक भवन, बुटीबोरी.

दगडफेकीमुळं लाठीचार्ज करावा लागला - मुख्यमंत्री विद्यार्थांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आज सकाळी विधानसभा सुरु झाल्यानंतर रेल्वेरोकोवरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला.

Posted By: BUTIBORI.INFO - 23:50:00
दगडफेकीमुळं लाठीचार्ज करावा लागला - मुख्यमंत्री

विद्यार्थांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आज सकाळी विधानसभा सुरु झाल्यानंतर रेल्वेरोकोवरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला.
मुंबई -  रेल्वे भरतीतल्या अभूतपूर्व गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत  दादर-माटुंग्या दरम्यान रेल रोको केला होता. या रेल रोकोमुळे कामावर जाणा-या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. याची दखल घेत रेल्वेने घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

विद्यार्थांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आज सकाळी विधानसभा सुरु झाल्यानंतर रेल्वेरोकोवरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठी चार्जवरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. यावरुन सत्ताधारी भाजपाला प्रश्न विचारण्यात आला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: उत्तर दिले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, रेल्वेने अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी सकाळी केलेल्या आंदोलनामुळं सीएसटीच्या दिशेनं जाणारी आणि येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रेल्वेने आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. सकाळी आंदोलन कर्त्यांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळं त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुढे बोलाताना ते म्हणाले की, सध्या रेल्वे आणि अंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सूरु आहे. त्यांना नोकरीत घ्यावं अशी मागणी होती.  100% अॅप्रेंटिस लोकांना नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी होती. पण तसं केल्यास अन्य शिक्षित तरुणावर अन्याय होईल त्यामुळे त्यांच्यासाठी 20 % जागा राखीव ठेवल्या आहेत. लवकरच यावर योग्य तो तोडगा निघेल.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या -

पंतप्रधान स्किल इंडियाची भाषा करतात आणि अनेक वर्षे रेल्वेमध्येच अॅप्रेंटिस केलेल्या विद्यार्थांना डावलून रेल्वे भरती प्रक्रिया राबवली जाते.या अनुभवी विद्यार्थ्यांचा उद्रेक होणे साहजिकच आहे. पियूष गोयल आंदोलकांवर काठ्या बरसवण्यापेक्षा त्यांच्या मागण्या आधी समजून घ्यायला हव्या.

धनंजय मुंडेंचा आरोप -

रेल्वेभरती परिक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत याची गंध वार्ताही सरकारला असू नये हे Intelligence Failure आहेच तसेच  गेल्या 3 वर्षात सातत्य पूर्ण रित्या रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे.

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर!

Posted By: BUTIBORI.INFO - 21:47:00

💥 _*दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर!*_

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उत्तरपत्रिका विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती मार्गावर आढळून आल्या. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या उत्तरपत्रिकांतील पहिल्या पानावर बारकोड असून त्या 2017 च्या असल्याचे सांगण्यात येते. मात्र या उत्तरपत्रिका जुन्या असून त्या वापरातील नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

वाहन स्क्रॅप धोरण मंजूर; जुन्या वाहनांवर कायमची बंदी*_

Posted By: BUTIBORI.INFO - 03:56:00
_*वाहन स्क्रॅप धोरण मंजूर; जुन्या वाहनांवर कायमची बंदी*_

सरकारच्या उच्चस्तरीय समितीने वाहन स्क्रॅप धोरणास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या नवीन धोरणानुसार आता 1 एप्रिल 2020 पासून 20 वर्षांपेक्षा जुनी ट्रक, बस, टॅक्सीसारखी व्यावसायिक वाहने चालवता येणार नाहीत. रस्ते परिवहन मंत्रालय याबाबत तीन महिन्यांत अधिसूचना जारी करू शकते. देशात सध्या 2 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त व्यावसायिक वाहने 20 वर्षांपेक्षा जुनी आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 7 गुण?

Posted By: BUTIBORI.INFO - 01:19:00
💥 _*बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 7 गुण?*_

बारावी रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये चार प्रश्नांत छपाईच्या चुका असल्याचे समोर आले आहे. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना आता सात गुण द्यावे लागणार आहेत. मुख्य नियंत्रकांनी घेतलेल्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली. राज्य बोर्डाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी मात्र अद्याप कोणतीही शिफारस मिळाली नसल्याचे सांगितले. या चुकांमुळे पुन्हा एकदा बोर्डाचा भोंगळा  कारभार चव्हाट्यावर आला आहे.

रेशनच्या दुकानात मिळणार दुध

Posted By: BUTIBORI.INFO - 09:41:00
🥛 _*रेशनच्या दुकानात मिळणार दुध*_
महाराष्ट्र शासन शिधावाटप दुकानात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देण्याच्या तयारीत आहे. सरकारने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. महानंदा दुग्धशाळेतील हे पदार्थ असणार आहेत. 

मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता संपूर्ण राज्यभरात रास्त भावात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ शिधावाटप दुकानात मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 2900 रेशनदुकानांमधून हे पदार्थ मिळणार आहे.

बळीराजा'ची हक्कांसाठी पायपीट...त्यांच्या वेदनांची जाणीव करून देणारी छायाचित्रे...

Posted By: BUTIBORI.INFO - 09:11:00

बळीराजा'ची हक्कांसाठी पायपीट...त्यांच्या वेदनांची जाणीव करून देणारी छायाचित्रे...

*किसान मोर्चाशी सरकारची चर्चेची तयारी*_


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार करत नाशिकहून पायपीट करत लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या शेतकरी मोर्चाचा फडणवीस सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. उद्या विधानभवनावर हा मोर्चा धडकण्याआधीच सरकारने मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून यासाठी चर्चेला येण्याचे निमंत्रण मोर्चेकऱ्यांना देण्यात आले आहे.




Copyright © 2013 Butibori News - बुटीबोरी न्यूज़™ is a registered trademark.

Designed by https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1. Powered By Blogger | Published By https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1