१ हजार ३४ कोटी रुपयांच्या कमाईसह भाजप सर्वाधिक श्रीमंत पक्ष; निवडणुकांवर खर्च केले तब्बल ६०६ कोटी
केंद्र सरकार तसेच देशातील बहुतांश राज्यात सत्ता असणारा भारतीय जनता पक्ष ( भाजप ) हा भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे. देशातील निवडणुका आणि राजकीय पक्षांच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफोर्म या संस्थेन २०१६ – १७ चा आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये १ हजार ३४ कोटी रुपयांच्या कमाईसह भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष बनल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१५ – १६ च्या तुलनेत भाजपचे उत्पन्न तब्बल ८१ टक्क्यांनी वाढले आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे उत्पन्न हे २२५ कोटी रुपये आहे.
निवडणुक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफोर्म या संस्थेन हा अहवाल बनवला आहे. दरवर्षी देशातील सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाला ऑडीट रिपोर्ट सादर करावा लागतो, हा रिपोर्ट सादर करण्याची ३० ऑक्टोबर २०१७ हि शेवटची तारीख असताना सत्ताधारी भाजपने तब्बल तीन महिने तर कॉंग्रेसने साडेतीन महिन्यांच्या उशिराने आपला ऑडीट रिपोर्ट सादर केला आहे.
२०१६ – १७ या आर्थिक वर्षात भाजपला तब्बल ९९७ कोटी रुपयांचे डोनेशन मिळाले आहे. तर कॉंग्रेसला मिळणाऱ्या डोनेशनचा ओघ कमी झाला असून पक्षाला केवळ ५० कोटी रुपयांचे डोनेशन मिळाले आहे.
भाजपने निवडणुकीवर केला ६०६ कोटींचा खर्च
२०१४ मध्ये भाजपा केंद्र सरकारमध्ये विराजमान झाली. त्यानंतर देशभरात झालेल्या बहुतांश निवडणुकांत पक्षाने विजय संपादन केले आहे. दरम्यान, १ हजार ३४ कोटींचे उत्पन्न असणाऱ्या भाजपने ६०६ कोटी रुपये निवडणुकांवर खर्च केले आहेत. तर विरोधीपक्ष कॉंग्रेसने १४९ कोटीं रुपये निवडणूकीवर खर्च केल्याच या अहवालात सांगण्यात आल आहे.
२०१४ मध्ये भाजपा केंद्र सरकारमध्ये विराजमान झाली. त्यानंतर देशभरात झालेल्या बहुतांश निवडणुकांत पक्षाने विजय संपादन केले आहे. दरम्यान, १ हजार ३४ कोटींचे उत्पन्न असणाऱ्या भाजपने ६०६ कोटी रुपये निवडणुकांवर खर्च केले आहेत. तर विरोधीपक्ष कॉंग्रेसने १४९ कोटीं रुपये निवडणूकीवर खर्च केल्याच या अहवालात सांगण्यात आल आहे.
देशातील प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे उत्पन्न
भाजप – १ हजार ३४ कोटी
कॉंग्रेस – २२५ कोटी
बसपा – १७३.५८ कोटी
सीपीएम – १०० कोटी
राष्ट्रवादी कॉंग्रेस – १७
तृणमूल कॉंग्रेस – ६.३९ कोटी
सिपिआय – २ कोटी
भाजप – १ हजार ३४ कोटी
कॉंग्रेस – २२५ कोटी
बसपा – १७३.५८ कोटी
सीपीएम – १०० कोटी
राष्ट्रवादी कॉंग्रेस – १७
तृणमूल कॉंग्रेस – ६.३९ कोटी
सिपिआय – २ कोटी
Share
& Comment
Tweet