या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी रात्रीच शहादा येथे धाव घेवून प्रकरणाची माहिती घेतली. व रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. दरम्यान, आज १० एप्रिल रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात येथील प्रांत कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे मोर्चा निघाला. या मोर्चात प्रामुख्याने युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, मराठवाड्याचे कार्यध्यक्ष गजानन बंगाळे, दिपक पगार, माजी मंत्री पदमाकर वळवी, राजेंद्र गावीत यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधीकारी व नेते उपस्थित होते. जवळपास १५ हजाराच्यावर शेतकरी सहभागी झालेला हा मोर्चा पाहून प्रशासनाला अक्षरशा घाम फुटला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या पाच दिवसात पुर्ण न झाल्यास महाराष्ट्र पेटवू असा ईशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.
सत्ताधारी भाजप सरकारवर आपल्या भाषणातून हल्लाबोल करताना तुपकर म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार सत्तेत आले त्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्या ऐवजी शेतकऱ्यांवरच निर्दयीपणे लाठीचार्ज करून शेतकऱ्यांचं रक्त सांडले, या भाजपवाल्यांना पैशाचा माज आणि सत्तेची मस्ती चढली आहे. मंत्र्यांना आता शेतकरी चुन-चुन के मारेंगे असा इशारा तुपकरांनी दिला. हिंमत असेल तर माझ्या छातीत गोळी घाला असे आव्हान तुपकरांनी दिले. रविकांत तुपकरांच्या या आक्रमक भाषणामुळे युवकांमध्ये प्रचंड जोष चढला होता. तुपकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या होत्या? तर आमच्या मालाला हमी भाव दया. हा हमीभाव देण्याऐवेजी सरकारच्या सांगण्यावरुन पोलीसांनी शेतकऱ्यांवर काठ्या चालविल्या. आता हा संघर्ष थांबनार नाही, या सरकारची मस्ती उतरविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी प्रांत कार्यालयात रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री पद्माकर वळवी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत रविकांत तुपकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. तुपकरांचा हा आक्रमक पवित्रा लक्षात घेता अधिकाऱ्यांनी त्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश काढले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील यांना निलंबित करावे व ३०७ प्रमाणे गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. यासंदर्भात तातडीने चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र आम्ही एवढ्यावरच थांबनार नाही या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन शेतकऱ्यांवर अमाणूषपणे लाठी हल्ला करणाऱ्या डिवायएसपी महारू पाटील यांना निलंबीत करुन इतरांवर पाच दिवसात गुन्हे दाखल करावे. या लाठीहल्यामागे सरकारचा हात आहे. असा आरोप तुपकरांनी केला. या प्रकरणी कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना महाराष्ट्रात फीरु देणार नाही असा सज्जड इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी सुध्दा शहादा शहर बंद ठेवून नागरीकांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठी हल्याचा निषेध केला. दोन दिवसात पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारीणीची बैठक ११ व १२ एप्रिल रोजी होऊ घातली असून या बैठकीत सुध्दा शहादा प्रकरणाचे पडसाद उमटणार असून महाराष्ट्रभर करण्यात येणाऱ्या आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीत ठरविण्यात येणार आहे. मोर्चात स्वाभिमानीचे नाशिकचे सोमनाथ बोराडे, मनोज भारतीय, विद्यार्थी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष पवनकुमार देशमुख, वसंत पाटील, कृष्णादास पाटील, सचिन पाटील, रविद्र पाटील, रत्नदीप पाटील, गणेश पाटील, निलेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share
& Comment
Tweet