विरोधकांवर साधला निशाणा
दहावीच्या पाठ्यपुस्तकातही भाजपने राजकीय स्वहित जोपासत केली अतिशोक्ती

काहीदवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दादरच्या शिवाजी मंदिरात दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणार असल्याचे तावडे म्हणाले होते. मात्र अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आलं आहे तर अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून राज्यशास्त्र हा विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप -शिवसेनेचे गोडवे तर विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातही भाजपने राजकीय स्वहित जोपासत अतिशोक्ती केल्याचे दिसून येत आहे. तसेच अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Share
& Comment
Tweet