नागपूर : नागपुरातील ज्योती धकाते यांनी मुंबई येथे नुकत्याच झालेल्या 'मिसेस अप्सरा महाराष्ट्र- २०१८' स्पर्धेत 'ब्युटीफूल हॅण्डस् ॲण्ड बॉडी' हा किताब मिळविला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ज्योती नागपुरातील एकमेव महिला आहेत. .
अदम्य इच्छाशक्ती, कठीण परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपण जे ठरवितो ते साध्य करू शकतो, असा विश्वास ज्योती यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना व्यक्त केला. या स्पर्धेत राज्यातील १५८ महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी २५ महिला अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. त्यातील 'ब्युटीफूल हॅण्डस् ॲण्ड बॉडी' हा बहुमान ज्योती यांना मिळाला आहे. या स्पर्धेत मॉडेलिंगला महत्त्व देण्यात आले होते. ज्योती स्टेज कलाकार असून लेखिकासुद्धा आहेत..
यासोबतच नागपूर आणि मुंबईचे दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात समन्वय साधून त्या टीव्हीसाठी मालिका आणि चित्रपटांची निर्मिती करीत आहेत. मुंबईच्या तुलनेत नागपूर शहराचा विकास अत्यंत मंदगतीने होत असल्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. यशाचे श्रेय कुटुंबाला देताना त्या म्हणाल्या, कुटुंबाची सोबत असेल तर जगात उत्तम कामगिरी करता येऊ शकते. पण, जर कुटुंबाची साथ नसेल तरीही प्रत्येक स्त्रीने आपले अस्तित्व जपले पाहिजे..
Share
& Comment
Tweet