'ब्रेनडेड'मुळे वाचले ४ जणांचे जीव
एक किडनी वोक्हार्टला, एक ऑरेंजसिटीला!.
मृत बोबडे यांची एक किडनी (मूत्रपिंड) वोक्हार्टमधील रुग्णालयाला तर दुसरी किडनी ऑरेंज सिटी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. विभागीय प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी अवयवदान प्रक्रियेत सहभाग दर्शविल्याबद्दल ओक्हार्टचे अभिनंदन केले..
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील किन्हाळा येथील रहिवासी जनार्धन रामजी बोबडे यांचा हिंगणघाटपासून २ किमी. अंतरावर अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना हिंगणघाट येथील रुग्णालयात तर नंतर सेवाग्राम येथे हलविण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून १४ फेब्रुवारी रोजी त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा १६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर अवयव प्रत्यारोपण (ऑर्गन ट्रान्सप्लांट)करिता त्यांना वोक्हार्ट रुग्णालयात आणण्यात आले. मध्यरात्री त्यांना डॉक्टरांनी अधिकृत 'ब्रेनडेड' घोषित केले. किन्हाळा गावातील कृषी केंद्राचे मालक विजय सिंग मोहता व सामाजिक कार्यकर्ते वीणा वाठोरे यांनी रुग्णाच्या परिवाराला अवयवदानाबद्दल माहिती देऊन प्रबोधन केले. त्यानंतर कुटुंबीयांनी होकार दिला. विभागीय प्रत्यारोपण समितीच्या आदेशाने मृत बोबडे यांच्यावर आज शनिवारी दुपारी शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. औरंगाबाद येथील एम.जी.एम. रुग्णालयातील डॉ. हुनैद व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. पार्शनाथ राव हे विशेष चार्टर फ्लाईटने वोक्हार्ट येथे दाखल झाले. तब्बल ३ तासांच्या शस्त्रक्रियानंतर बोबडे यांचे यकृत (लिव्हर) पाठविण्यासाठी वाहतूक उपायुक्त रघुवंशी यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक ताथोड यांनी ग्रीन कॅरिडोर तयार केले. दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी शंकरनगरातून यकृत निघाले आणि अवघ्या ६ मिनिटांत विमानतळावर पोहोचविण्यात आले. तसेच फोर्टिस हॉस्पिटल चेन्नईचे हृदयरोग सर्जन डॉ. मोहन व त्यांची टीम विशेष चार्टर विमानाने ओक्हार्टमध्ये दाखल झाली. तब्बल तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हृदय काढून चेन्नईला पाठविण्यात आले..

Share
& Comment
Tweet