उघड्यावरील पाणीपुरीमुळे बुटीबोरीवासींचे आरोग्य धोक्यात
बुटीबोरी : येथील एमआयडीसी चौकात अनेक दिवसांपासून पाणीपुरी, नूडल्स, आईसक्रिमची दुकाने सुरू आहेत. येथील पाणीपुरी खाल्ल्याने यापूर्वी महिला व लहान मुलांची प्रकृती बिघडल होती. .
पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे सुरू असलेल्या दुकानांपैकी एका दुकानदाराने अन्न व औषध प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली नाही. दुकानात व्यावसायिक सिलिंडरऐवजी घरघुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर केला जातो. या दुकानातील अन्नपदार्थांच्या नमुन्यांची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे. मात्र, कारवाई होत नसल्याने दुकानदारांची हिम्मत वाढली आह.े यापूर्वी बुटीबोरी एमआयडीसीतील अधिकारी व बुटीबोरी पोलिसांनी त्यांचे अतिक्रमण काढले होते. मात्र, पुन्हा 'जैसे थे' स्थिती आहे. सातगाव रोडवर पोस्ट ऑफिससमोर दुकाने थाटली आहे. अनेकदा येथील पोस्ट ऑफिस अधिकारी यांनी पोस्ट ऑफिस समोरून दुकाने हटविण्याची विनंती केली. मात्र, पाणीपुरी विक्रेते ऐकत नसल्याने पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने व बुटीबोरी पोलीस व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ाा पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बुटीबोरीवासी करीत आहे.
Share
& Comment
Tweet