टाकळघाट येथे अपघातात युवकाचा मृत्यू
|
आमची बुटीबोरी (प्रतिनिधी) : येथून ७ किमी अंतरावरील नागपूर ते वर्धा रोडवर रविवारी सायंकाळी टाकळघाट शिवार येथे घडलेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गौरव प्रकाश बागडे (२६) रा. नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनचालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवून गौरवच्या मोटारसायकल (क्र. एमएच-३१/डीआर-२१९२)ला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या गौरवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या वेळी मोटारसायकलवर मागे बसलेला नितीन शालिक लोणारे (२८) रा. नागपूर हा युवक जखमी झाला. याप्रकरणी फिर्यादी खुशाल कवडू शंभरकर (२९) यांच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास साहाय्यक फौजदार केशव राठोड करीत आहेत |
टाकळघाट येथे अपघातात युवकाचा मृत्यू
Posted By: BUTIBORI.INFO - 23:13:00About BUTIBORI.INFO
Techism is an online Publication that complies Bizarre, Odd, Strange, Out of box facts about the stuff going around in the world which you may find hard to believe and understand. The Main Purpose of this site is to bring reality with a taste of entertainment
Share
& Comment
Tweet