#वर्धा ते मुख्यमंत्री सचिवालय,नागपूर पर्यंत तीन हजार झोपडपट्टी वासीयांच्या पैदलमार्च
नागपूर/२२ मार्च:- देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर हवे असते.त्याकरिता तो दिवस रात्र खस्ता खात असतो.हाच उद्देश नजरेसमोर ठेवून वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण अतिक्रमण धारक झोपडपट्टीवासीयांनी वर्धा ते मुख्यमंत्री सचिवालाय,नागपूर पर्यंत तीन हजार झोपडपट्टीवासीयांचा ८५ किलोमीटरचा पैदालमार्च आज बुटी बोरी येथे दुपारी १२:०० पोहचला होता.
प्रत्येकाला हक्काचे घर हवे असते,मात्र प्रत्येकाची आर्थिक कुवत चांगली नसल्यामुळे तो आपल्या हक्काचा निवारा निर्माण करू शकत नाही.त्यामुुळे अनेक जण वर्धा शहरात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून झोपडी वजा लहानसे घर निर्माण करून राहतात.त्यांना शासनाने पट्टे वाटप करून शासकीय योजनेत समाविष्ट करून घरकुल निर्माण करून देण्याची मागणी घेऊन दि २० मार्चला वर्धा शिवाजी महाराज चौकातून या पैदालमार्चची सुरुवात झाली.ती आज दि २२ मार्चला बुटी बोरी येथे पोहचून आज नागपूर हॉटेल रेडी सॅन ब्लु जवळ पोहचेल.वर्धा शहरात व जिल्ह्यात जवळपास हजार कुटुंब अतिक्रमित जागेवर राहतात. लोकप्रतिधी निवडणूक काळात पट्टे वाटप व घरकुल बांधून देण्याचे आमीश देऊन मत लुटतात व त्यानंतर पाच वर्षे आपला चेहराही दाखवत नाही.म्हणून लोकप्रतिनिधींनी दाखविलेले घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून वर्धा येथील युवा परिवर्तन कि आवाज या सामाजिक संघटनेने जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण धारकांना एकत्र करून हि ८५ किलोमीटरची पायदळ यात्रा काढून प्रशासनावर दबाव टाकून आपला हक्क झोळीत पाडण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जात आहे.
Share
& Comment
Tweet