बुटीबोरी गेट न.6 के समीप स्कुल से पेपर देकर घर लौट रही छात्रा की ट्रक से टक्कर लगने के कारण घटना स्थल पर ही मौत हो गयी
घटना में लड़की ( वैष्णवी राजेन्द्र धावड़े ,उम्र -16 ) टेम्भरी में रहती थी ।जो की सरस्वती बाई निस्तानी विद्यालय( टाकलघाट )में 10 कक्षा में पड़ती थी ।वैष्णवी स्कुल से अपने घर सायकल पर आ रही थी तभी एक ट्रक क्रमांक MH 34 AM 5749 ने टक्कर मारी , सूत्रों के मुताबिक ट्रक चालक नशे की हालात में धुत था। ट्रक की टक्कर की वजह से वैष्णवी की घटनास्थल पर ही मृत्यु हो गई ।पोलिस ने घटनास्थल पर पोहच कर मामला दर्ज कर आगे की कार्यवाही कर रही है
ट्रक च्या धडकेत विद्यार्थिनीच्या मृत्यू
टाकळघाट येथील इंडोरामा गेट.क्र.६ समोरील घटना
टाकळघाट/२२ मार्च:/
भरधाव येणाऱ्या ट्रकने विद्यार्थिनीच्या सायकलला जोरदार धडक दिल्याने विद्यार्थिनीच्या जागेवरच मृत्यू झाला.ही घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील इंडोरामा गेट क्र.६ समोर दुपारी १:४५ वाजता च्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की,वैष्णवी राजेंद्र ढवळे(१७) रा.टेंभरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती टाकळघाट येथील श्रीमती सारस्वतीबाई निस्ताने विद्यालयाची विद्यार्थिनी असून ती इयत्ता १० ला शिकत होती.आज १०वी चा शेवटच्या पेपर देण्याकरिता टाकलघाट येथील अमर हायस्कुल येथे आली होती.पेपर संपल्यानंतर ती घरी जाण्याकरिता आपल्या सायकलने निघाली असता ती इंडोरामा येथील शिवमंदिर जवळ असलेली वळण पार करताच इंडोरामा कडून येणाऱ्या MH ३४ AB ५७४९ क्रमांकाच्या भरधाव ट्रक ने विद्यार्थिनीच्या सायकल ला जोरदार धडक दिली.ही धडक एवढी जोरदार होती की.ट्रक ने काही अंतरापर्यंत विद्यार्थानीला ओढत नेले.यामध्ये ती गंभीर जख्मि होऊन घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक फरार झाला.अपघात होताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करून एमआयडीसी पोलिसांना सूचना दिली.त्यानंतर मृत विद्यार्थिनीला बुटीबोरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मृत घोषित केले व तिला नागपूर येथे मेडिकल ला पाठविण्यात आले.
एमआयडीसी पोलिसांनी फरार झालेला ट्रक चा शोध घेऊन ट्रकचालक उमेश जंगली महतो(६०)रा .चंद्रपूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास ठाणेदार मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
ब्रेकरची मागणी…..
या ठिकाणी अनेकदा अपघात होऊन स्थनिक व बाहेरील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.अपघात केव्हा होईल आणि कधी प्राण झालेलं हे सांगताच येत नाही.अपघात रोकण्याकरिता इंडोरामा गेट क्र.६ वर गतिरोधक (ब्रेकरची)मागणी नागरिकांनी या याठिकाणी उचलून धरली होती.
Share
& Comment
Tweet