मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली होती.

Posted By: BUTIBORI.INFO - 23:43:00

Share

& Comment





मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली होती.
मुंबई - मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली होती. तब्बल साडेतीन तासांनंतर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले व सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला. 

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.  रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. सकाळी 7 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. माटुंगा-दादर रेल्वे स्टेशनदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकल, एक्स्प्रेस अडवून ठेवल्या होत्या. आंदोलनामुळे सीएसटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला.  
रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिसांनी लाठीचार्च केल्यानं विद्यार्थ्यांनी लोकलवर दगडफेकही केली होती. 

या आहेत प्रशिक्षणार्थींच्या मागण्या?

रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा
रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा
यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये
अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रेल रोको घेतला होता.  महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
Live Updates :

- रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांचा रेलरोको आंदोलन साडेतीन तासांनंतर मागे
- विद्यार्थ्यांनी रेल्वेट्रॅक केले मोकळे 
- अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन घेण्यात आले मागे 
- रेल्वे जीएमशी चर्चा झाली सकारात्मक, आंदोलक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

10:49 AM साडेतीन तासांनंतर अॅप्रेंटिस उमेदवारांचा रेलरोको मागे, अडकलेल्या लोकल रवाना

10:39 AM मुंबई- दादर-माटुंगा रेल्वे रोको : एक ट्रेन सीएसटीकडे, दुसरी ट्रेन कल्याणकडे रवाना

10:35 AM मुंबई- रेल्वेमंत्री पीयूष गोयल आंदोलकांची भेट घेणार, सूत्रांची माहिती
लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम, गेल्या तीन तासांपासून वाहतुकीचा खोळंबा

09:20 AM दादर-माटुंगा रेल रोको : रेल्वे प्रशासन झुकलं, फक्त अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी घेणार विशेष परीक्षा. 

ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार ,विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा

08:54 AM विद्यार्थ्यांच्या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेची वाहतूक 2 तासांपासून ठप्प

कुर्ल्यापासून कर्जत आणि कसारा अशी वाहतूक सुरू,  स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी 

मध्य रेल्वेवरील स्टेशनजवळील बेस्ट डेपोमधून ज्यादा बस सोडण्याचे आदेश

08:51 AM  दादर-माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको, बेस्ट प्रशासनाने कुर्ला, घाटकोपर आणि मुलुंड येथून जास्त बस सोडण्याचे दिले आदेश

08:49 AM दादर-माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको, रेल्वे पोलिसांच्या लाठीचार्जेमुळे 7 विद्यार्थी जखमी, 2 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1 महिला कॉन्स्टेबलसुद्धा किरकोळ जखमी.

08:40 AM : मध्य रेल्वेची वाहतूक कुर्ला स्टेशनपर्यंत सुरू, कुर्ल्यापासून सीएसटीपर्यंत वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णतः ठप्प, मेल-एक्सप्रेसदेखील रखडल्या.

08:31 AM : मुंबई- मध्य रेल्वेवरून पहिली लोकल ठाण्याकडे रवाना

- आंदोलकांनी रेल्वे रोखल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांची दगडफेक केली, रेल्वेकडून चर्चेसाठी कोणताही अधिकारी अद्याप घटनास्थळी दाखल नाही.

- पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रत्युत्तरादाखल आंदोलकांची दगडफेक

- आंदोलकांनी रोखलेली एक्स्प्रेस रवाना, ठाण्याच्या दिशेला एक लोकल सोडली, मात्र मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प

काय आहे नेमके प्रकरण?

अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थी आज मुंबईत दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी सकाळी लोकल अडवून ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या. त्यांची भेट घेतली, पण गोयल यांनी अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे.

नेमक्या मागण्या काय?
पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचे, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय. शिवाय, एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा तरुणांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

About BUTIBORI.INFO

Techism is an online Publication that complies Bizarre, Odd, Strange, Out of box facts about the stuff going around in the world which you may find hard to believe and understand. The Main Purpose of this site is to bring reality with a taste of entertainment

Copyright © 2013 Butibori News - बुटीबोरी न्यूज़™ is a registered trademark.

Designed by https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1. Powered By Blogger | Published By https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1