गोंडखैरीः येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडखैरी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सभेचे आयोजन करुन उपस्थितांची निःशुल्क आरोग्य व प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रभारी वैद्यकिय अधिकारी डाँ.सोनाली बाके,डाँ.यमुना मांडवधरे,आरोग्य साहायिका सरस्वती सुरजूसे यांचेसह आरोग्य सेविका रंजना चंदनखेडे,निलीमा चौव्हान,अनिता वाघ,सोनाली कडु,माधुरी गजभिये,भावना चोपडे,शुभांगी काकडे,पोर्णिमा लांजेवार,पुष्पा रामटेके,सुमित्रा घोडे,शारदा बेताल,मसराम,आशा गटप्रवर्तक रेखा भांगे,पुजा खांडेकर उपस्थित होते.
यावेळी श्रीमती शालीनी मांडवधरे यांनी महिला दिनानिमित्त अनेक प्रकारच्या गितांचे सादरीकरण करण्यात आले. विविध कार्यक्रमासह संगित खुर्ची,व्याख्यान वाचन करण्यात आले. उपस्थित महिलांची थायराँईड,हिमोग्लोबीन,शुगर,ब्लड-प्रेशर,एचआयव्ही आदी तपासणी निःशुल्क करण्यात आली.महिलांना आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. कार्यक्रमास लिंक वर्कर छाया इंगोले व आशा स्वयंसेविका सुचिता पेटकर,प्रतिभा तूरकर, जोत्सना कुबडे,सोनाली अतकरी ऊषा मेहेरे,चंदा अतकरी,रेखा अत्रे,दिपा खुजे,मंगला नारनवरे आदि उपस्थित होते.
महिला दिनाचे निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडखैरी येथे कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया रुग्णांना फळ-फ्रुट वाटप करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ता दिपक डोंगरे,विजय अतकरी,सिध्दार्थ सोनटक्के,दिलीप कुबडे,अंकुश चिंधालोरे आदि उपस्थित होते. दवाखान्यात भर्ती रुग्णांना येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत अतकरी(काका) यांचे तर्फे निःशुल्क थंड पाणि पुरवठा करण्यात आला.
Popular
Tags
Videos
Share
& Comment
Tweet