बुटीबोरी येथे हार्दिक पटेल यांचे जंगी स्वागत
# बुटीबोरी राष्ट्रीय काँग्रेस व युवक कॉग्रेस चे पदाधिकारी स्वागता त उपस्थित
नागपूर/२३ मार्च:- देशात वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व वाढती बेरोजगारी हि फार मोठी समस्या असून मोदी सरकारने निवडणुकीच्या प्रचारसभेत या विषयाचे खूप मोठे भांडवल केले होते.परंतु आजघडीला सरकारला 4 वर्षे उलटून देशात व राज्यात दोन्ही समस्या कमी न होता यांचा आलेख वाढतच आहे.म्हणून या समस्येला वाचा फोडण्यासाठी गुजरात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची अकोला येथे सायंकाळी 6 वाजता सभा आहे.ते अकोल्याला बुटी बोरी येथून सभेकरिता जात असतांना बुटी बोरी काँग्रेस व युवक काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी सुधीर देवतळे, अशोक जैस्वाल, योगेश कोरडे,यूसुफ शेख,राजू गावंडे,सुरेश वलिवकर,राहुल पटले,नीलेश पाटिल,अभय मून,शकील खान,शुभम पांडे,तेजा लोणारे,आरिफ शेख व परिसरातील शेकड़ो कार्यकर्ता उपस्तीत होते.
Share
& Comment
Tweet