बुटी बोरी औधोगिक क्षेत्रातील MIDC कार्यालयासमोर आज दुपारी १:४५ ते २:००वाजता दरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धडकेत विरुद्ध बाजूने येत असलेल्या दुचाकी ला धडक दिल्याने एक जण जागीच मृत्यू पावला तर एक गंभीर जखमी झाला. हि घटना MIDC पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली
सविस्तर वृत्त असे की, मृतक राहुल अनिल नंदेश्वर(२६) व जखमी आनंद सीताराम राऊत (४२) रा गांगापूर झोपडपट्टी टाकळघाट हे दोघेही दुचाकी क्रं MH 40 AH 4498 ने इंडोरामा कंपनी गेट क्रं ३ येथील वाईन शॉप वरून दारू पिऊन MIDC पोलीस स्टेशन कडे येत असतांना त्यांचे विरुद्ध बाजूने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना समोरासमोर धडक दिली त्यात राहुल नंदेश्वर हा जागीच ठार झाला तर आनंद राऊत जखमी झाला.MIDC पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व जखमीला उपचाराकरिता बुटी बोरी येथील रचना हॉस्पिटल येथे रवाना केले.पुढील तपास MIDC पोलीस करीत आहे.

Popular
Tags
Videos
Share
& Comment
Tweet