बुटीबोरी .
येथील अर्जुन सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी १० वाजता बालभारती ग्राउंड येथे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विजय मराठे यांच्या हस्ते अर्जुन आमदार चषकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एमआयडीसी पोलीस निरीक्षक मधुकर गीते, बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, अर्जुन सामाजिक संघटनेचेे अध्यक्ष व जवाहरलाल नेहरू ड्राय पोर्ट सिंधी रेल्वेचे चेअरमन बबलू गौतम, आकाश वानखेडे, अविनाश गुर्जर, देवराव डोईफोडे, मुजीब पठाण, विनोद लोहकरे, मुन्ना जैस्वाल, दीपक गुर्जर, दिलावर खान, दिलीप नागपुरे, शफी शेख, नरू गौतम, समीर बोरकुटे, दिनेश काकपुरे, कुदरत सैयद, बालू भगत उपस्थित होते. येथे हेवी टेनेक्स टेनिस बॉल राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होत असून ही स्पर्धा २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यात पहिले बक्षीस तीन लाख, द्वितीय एक लाख ५१ हजार असून सन्मानपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रेक्षकांना दहा दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत येणार आहे..
Share
& Comment
Tweet