परिचर्चेत मान्यवरांचा सूर : महापौरांनी विषयतज्ज्ञांना केले बोलते
नागपूर : पर्यावरण, वैद्यकीय, औद्योगिक, वाहतूक आणि शहराच्या मूर्त बदलाच्या दृष्टीने नागपूर मेट्रो बेस्ट आहे. यामुळे नागपूरकरांच्या जीवनशैलीत आमूलाग्र परिवर्तन घडून येईल, असा सूर मान्यवरांनी नागपूर मेट्रोतर्फे आयोजित परिचर्चेतून व्यक्त केला. .
महामेट्रोतर्फे नागपूर मेट्रोच्या तिसऱ्या स्थापनादिनानिमित्त हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित परिचर्चेचा हा सूर आवळला. शहराच्या प्रथम नागरिक महापौर नंदा जिचकार यांनी मेट्रोमुळे नागपूरकरांच्या जीवनात काय बदल होईल, या अनुषंगाने चर्चेला सुरुवात केली. विषयतज्ज्ञांना बोलते केले. पर्यावरणीय दृष्टीकोनातून मेट्रोची उपयुक्तता स्पष्ट करताना नीरी या संस्थेचे माजी संचालक डॉ. सतीश वटे म्हणाले की, मेट्रोतून एकाच वेळी अनेक संख्येने नागरिक प्रवास करणार आहे. खासगी दुचाकी, चारचाकीचालक आपल्या वाहनातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणासाठी घातक प्रदुषके उत्सर्जित करतात. मेट्रोच्या वापरामुळे या प्रदुषकांच्या उर्त्सजनाला आळा बसेल. मेट्रोने केलेल्या वृक्षारोपणामुळे वातावरणातील ऑक्सिजनची मात्रा वाढेल. सोबतच वाहनातून होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडच्या उत्सर्जनाला आळा बसल्याने वातावरणातील ते प्रमाण कमी होईल. पर्यायाने ऑक्सिजनचे प्रमाण बऱ्यापैकी वाढेल. डॉ. प्रशांत जगताप म्हणाले की, जपानमधील एका शहरात सर्वसामान्यातील डायबिटीज, ओबेसिटी आणि हायपर टेंशनचे प्रमाणापेक्षा तेथील मेट्रोने प्रवास करणाऱ्यांमध्ये तुलनेते हे प्रमाण कमी आहे. कारण मेट्रोमुळे प्रवाशांना स्टेशनपर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे सक्तीने चालण्याची सवय लागते. प्रदूषण नसल्याने मेट्रोतून तणामुक्त प्रवास करणे शक्य होते. त्यामुळे गाडी चालविण्याचे टेंशन नसते. व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे म्हणाले की, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नाशिक आणि पुणे यापूर्वी बेस्ट ऑप्शन मानले जात होते. मात्र, अलीकडे नागपुरात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. नागपूरचे देशातील मध्यवर्ती स्थान, रस्ते, रेल्वे आणि मेट्रोच्या कनेक्टिव्हीटीमुळे गुंतवणूकदार आता नागपूरला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी मेट्रोने जोडली जाणार आहे. उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ उद्योगांपर्यंत जाण्यास मेट्रोमुळे सुलभ होईल. आर्किटेक्ट अवंतिका चिटणीस म्हणाल्या की, शहराच्या एकूणच जडणघडणीत होणाऱ्या विकासामुळे, माहितीची देवाणघेवाण आणि हेरिटेज वास्तू जतन करण्याच्या दृष्टीने शहराच्या सर्वंकष विकासाची गरज व्यक्त केली. स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करताना मेट्रोने या तिन्ही बाबी लक्षात वाटचाल करावी, अशी सूचना त्यांनी केली. वरिष्ठ पत्रकार आलोक तिवारी यांनी मेट्रोची शिस्तबद्ध वाटचाल आणि विकासकामांपासून सार्वजनिक कामे करणाऱ्या संस्थांनी प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त केली. बृजेश दीक्षित म्हणाले की, मेट्रो केवळ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नव्हे तर शहराची एकूणच जीवनशैली बदलण्यात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला..

Share
& Comment
Tweet