प्रेमात मिळालेल्या नकारामुळे(प्रेमभंग) रुईखैरी येथील २२ वर्षीय तरुण हर्षल पुरुषोत्तम भोयर याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुटी बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत आज दि.२६ फेब्रु ला सकाळी ७:०० वाजता दरम्यान उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, घटनेच्या वेळी हर्षल हा घरी एकटाच होता.त्याचे आई वडील २५ फेब्रु ला पिपरी (वेलतुर) ला साक्षगंधला गेले होते.दि.२५ तारखेला संध्याकाळी ७:०० वाजता मामाने घरी जेवण करायला बोलावले असता त्याने मी बाहेरून जेवण करून येतो म्हणून घराबाहेर निघून गेला.आज सकाळी त्याची मामी त्याला झोपेतून जागे करायला गेली असता तिला खिडकीतून हर्षलने फाशी लावल्याचे दिसून आले.हर्षल हा बुटी बोरी औधोगिक क्षेत्रातील इंडिगो डेनीम कंपनीत काम करीत होता.त्याचे मूळ गाव वेलतुर जवळ असून त्याचे आईवडील कामाच्या शोधात १९९८ पासून आपल्या मेव्हण्याच्या सहाऱ्याने रुईखैरी येथे राहायला आले होते.हर्षल हा मूळचा वेलतुर कडील असल्यामुळे तो मूळ गावाकडे नेहमी जात असे त्यामुळे तिकडील च एका मुलीशी त्याचे सूत (प्रेम) जुडले होते.परंतु त्यांच्या मध्ये काहीतरी बिनसले मुळे तो हताश झाल्याचे त्याने मृत्यू पूर्वी लिहिलेल्या पत्रात “मै तेरे बगैर जिंदा नही रह शकता” असे लिहून पंख्याला गळफास घेऊन अवघ्या २२ वर्षी तारुण्यात आपली जीवनयात्रा संपविली.
Share
& Comment
Tweet