आजी-नातीचा मनाचा थरकाप उडवून सुन्न करणारे दुहेरी हत्याकांड

Posted By: BUTIBORI.INFO - 22:10:00

Share

& Comment

नागपूर : नागपुरातील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या मातोश्री उषाबाई कांबळे आणि मुलीचा निर्दयपणे खून करणाऱ्या आरोपी गणेश शाहूला सोमवारी हुडकेश्‍वर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता शुक्रवार, २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उर्वरित तीन आरोपी पत्नी गुडिया गणेश शाहू, भाऊ अंकित शाहू आणि नातेवाईक सिद्धू शाहू, यांची पोलीस चौकशी करीत आहेत.
एका वेब पोर्टलमधील पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषा सेवकदास कांबळे आई व दीड वर्षीय चिमुकली राशी ऊर्फ अपेक्षा, या शनिवारला घराजवळून बेपत्ता झाल्यानंतर त्या दोघींचा भिसीच्या वादातून घरा शेजारी राहणाऱ्या आरोपी गणेश शाहू व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गळा चिरून निघृर्ण खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून नाल्यात पुरविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिघोरी घाटावर या दोघींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. .
सोमवारी सकाळी दिघोरीमार्गावरील टेलिफोननगर चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन नागरिकांनी केले होते. सोमवारी सकाळी मंडळातर्फे शंखनाद बॅण्डसह मोठा उपक्रम राबविण्यात येणार होता. मात्र, दिघोरीत झालेल्या काबंळे कुटुंबातील दुर्दैर्वी घटनेमुळे आयोजकांनी कार्यक्रमाचे स्वरूप बदलविले.त्यांनी आयोजन स्थळाची जागा बदलवून कोणताही गाजावाजा केला नाही. मंडळातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाने दिघोरी परिसरात हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे..
रविकांत यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला हा सर्व पत्रकारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उच्चस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुहेरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालावा. त्यासाठी उज्ज्वल निकम यांची शासनाने नेमणूक करावी. आरोपींना फाशी मिळेपर्यंत पत्रकार स्वस्थ बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया पत्रकार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. .
दुचाकीस्वारामुळे बदलविला प्लॅन.
उषाबाई कांबळे आणि चिमुकल्या राशीला मारल्यानंतर पोलिसांना चक्रावून सोडण्यासाठी आरोपींनी हे दोेन्ही मृतदेह नाल्यात फेकण्याची योजना आखली. उमरेड रोडकडे जाताना पहिल्याच नाल्याजवळ त्यांनी कार थांबविली. नाल्याच्या समोर कार उभी करून कारमधून मोबाइल फेकला. तेथेच राशीचा मृतदेह फेकण्याचा गणेशचा बेत होता. मात्र, तेथून दुचाकीस्वार आल्यामुळे त्याने कार पुन्हा सुरू केली आणि विहीरगावकडे जाणाऱ्या दुसऱ्या नाल्यात दोन्हीही मृतदेह फेकले..
नागपूर : उषाबाई कांबळे आणि दीड वर्षाच्या चिमुकल्या राशीच्या निघृर्ण हत्येनंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हळूहळू सर्व बाबी समोर येऊ लागल्या आहेत. मनाचा थरकाप उडवून मन सुन्न करणारी तथ्ये प्राथमिक तपासादरम्यान उघड होत आहेत. त्यात सर्वांत महत्त्वाचा म्हणजे जिवाच्या आकांताने रडत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीची एक महिला इतक्या क्रूरपणे हत्या करू शकते, हा प्रश्न मन भेदून टाकतो. .
शनिवारी सायंकाळी जेव्हा उषाबाई कांबळे नात राशीसोबत भिसीचे पैसे मागण्यासाठी किराणा दुकानदार गणेश रामचरण शाहू रा. पवनसूतनगर याच्या घरी गेल्या, तेव्हा पैशावरून गणेश व त्याची पत्नी गुडिया यांच्याशी त्यांचा वाद झाला. शेवटी गणेश आणि गुडियाने पैसे देण्यासाठी उषाबाईला वरच्या माळ्यावर नेले. पण, तिथे गेल्यावर दोघा पती-पत्नीची कू्ररता एका पशूलाही लाजवणारी होती. खोलीचे दार बंद करताच गणेशने उषाबाईचे केस धरले आणि डोके तीनवेळा भिंतीवर आदळले. त्यामुळे उषाबाई बेशुद्ध पडल्या. या वेळी चिमुकली राशी आजीच्या कडेवर होती, पण त्या बेशुद्ध पडल्याने ती जमिनीवर पडल्याने रडू लागली. उषाबाई 8पान २ वर....
एका वेब पोर्टलमधील पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषा सेवकदास कांबळे आई व दीड वर्षीय चिमुकली राशी ऊर्फ अपेक्षा, या शनिवारला घराजवळून बेपत्ता झाल्यानंतर त्या दोघींचा भिसीच्या वादातून घरा शेजारी राहणाऱ्या आरोपी गणेश शाहू व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गळा चिरून निघृर्ण खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून नाल्यात पुरविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिघोरी घाटावर या दोघींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. .
कांबळे कुटुंबीयांच्या दु:खात हजारो लोक सामिल झाले. दुपारी एक वाजताच्या दरम्यान मेडिकल येथून शवविच्छेदनानंतर त्या दोघींचे मृतदेह घरी आणण्यात आले असता सर्वांच्या अश्रूचा बांध फुटला. राशीची आई रूपाली व वडील रविकांतने चिमुकल्या राशीला कवटाळून हंबरडा फोडला. तर, पत्नी व नात गेल्यामुळे नि:शब्द असलेल्या सेवकदास यांच्या अश्रूच्या धारा अनावर झाल्या. सर्व सोपस्कार, संस्कार आटोपल्यानंतर दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वर....
हंबरडा, हुंदका अन् परिसर नि:स्तब्ध.

About BUTIBORI.INFO

Techism is an online Publication that complies Bizarre, Odd, Strange, Out of box facts about the stuff going around in the world which you may find hard to believe and understand. The Main Purpose of this site is to bring reality with a taste of entertainment

Copyright © 2013 Butibori News - बुटीबोरी न्यूज़™ is a registered trademark.

Designed by https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1. Powered By Blogger | Published By https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1