माहिती देण्यास टाळाटाळ
बुटीबोरी : टाकळघाट ग्रा.पं.ला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले. तालुक्यात प्रथमच जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळाला. मात्र ग्रामविकास अधिकारी फमेंद्र साबळे माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. .
साबळे जी माहिती देत आहेत ती चुकीची आहेत. ग्रा.पं.ने इंडोरामा कंपनीला ४५ टक्क्यांची सवलत दिली. तसा ठराव ग्रा.पं.ने जि.प.ला पाठविला. याबाबत कंपनीने ग्रा.पं. परिसरात कोणकोणती लोकोपयोगी कामे केली याची माहिती माहिती अधिकारात मागितली. परंतु माहिती ग्रा.पं.ला माहीत नाही, असे उत्तर दिले. ग्रा.पं.ने जि.प.ला माहिती दिली. ग्रा.पं. कर्मचाऱ्याला माहिती पाहण्यास वेळ लागला. प्रत्येक तासाला शंभर रुपये वसूल केले. माहिती पाहायची असेल, तर तासाप्रमाणे पैसे घायला पाहिजे असा नियम आहे. गटविकास अधिकारी हिंगणा महेंद्र जुवारे यांनी ग्रा.पं.कडे अपील केली. परंतु अपील अधिकारी कोहाट यांनी ग्रामविकास अधिकारी साबळे यांना माहिती देण्यास सांगूनही ते माहिती देत नव्हते. त्यामुळे ग्रा.पं.त भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी चौकशी केल्यास मोठे घबाड हाती येऊ शकते. .
Share
& Comment
Tweet