प्रवेशपत्रावर उपकेंद्राचा उल्लेखच नाही
बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांचे वाटप करण्यात आले. त्या प्रवेशपत्रावर नोंदविण्यात आलेल्या मुख्य केंद्रात जाऊन त्यांची बैठकव्यवस्था नेमकी कोणत्या महाविद्यालयात करण्यात आली आहे, याची माहिती त्यांनी घ्यावी. परीक्षेच्या दिवशी जाऊन त्यांनी परीक्षा केंद्र शोधण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकेल. त्यामुळे परीक्षेच्याअगोदरच नेमकी कुठे बैठकव्यवस्था झाली आहे, याची माहिती घ्यावी..
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवरून फुटू लागल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रात येण्यास उशीर झाल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे यापूर्वीच राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट परीक्षेच्या दिवशी केंद्रावर न जाता त्यापूर्वीच बैठकव्यवस्थेची माहिती घ्यावी.
नागपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेच्या प्रवेशपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. मात्र, प्रवेशपत्रांनी विद्यार्थ्यांची चांगलीच झोप उडविली. या प्रवेशपत्रांवर केवळ परीक्षेच्या मुख्य केंद्राचाच उल्लेख आहे. मात्र, त्या केंद्राअंतर्गत असलेल्या उपकेंद्रावर जर बैठक व्यवस्था करण्यात आली असेल तर त्याचा उल्लेखच प्रवेशपत्रावर करण्यात आलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेआधीच केंेद्र शोधून ठेवणे सोयीचे राहणार आहे..
बोर्डाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून नुकतेच प्रवेशपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये जर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मुख्य केंद्राऐवजी उपकेंद्रावर
Share
& Comment
Tweet