डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ११ वर्षीय बालक दगावला
बुटीबोरी माया हॉस्पिटल
मधील घटना
मुलाच्या मृत्यूमुळे रंगाचा उत्सव झाला बेरंग
नागपूर/०१ मार्च:- बुटीबोरी येथील सर्वात मोठे असलेले खाजगी रुग्णालय माया हॉस्पिटल येथे मृतक संकेत किशोर गिरोले वय ११ वर्ष रा प्रसाद कॉलोनी बुटी बोरी याचा आज दि.१ मार्च ला उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे औषधांच्या ओव्हरडोज मुळे संकेत चा मृत्यू झाल्याची तक्रार त्याचे वडील किशोर संपत गिरोले यांनी बुटीबोरी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सविस्तर वृत्त असे की, संकेत याला हगवण, उलटी व ताप असल्यामुळे त्याला दि. २८ फेब्रु ला माया हॉस्पिटल मध्ये भरती केले होते. आज होळी असल्यामुळे मुलाला रुग्णालयातून सुटी होईल,त्यानंतर सर्व कुटुंब मिळून खुशीने रंगाचा हा उत्सव साजरा करू पण संकेतच्या अशा अचानक सोडून जाण्याने गिरोले परिवाराचा हा रंगाचा उत्सव बेरंग झाला आहे.आज दि १ मार्च ला संकेत ला रुग्णालयातून सुटी होणार होती.परंतु सुटी देण्यागोदार डॉक्टरांनी संकेत ला दोन इंजेक्शन सरळ व एक इंजेक्शन सलाईन मधून दिले.इंजेक्शन लावताच तो अचानक बेशुद्ध पडला.त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आय सी यु मध्ये नेले.परंतु त्याचा मृत्यू झाला.हगवण उलटीचा रुग्ण अचानक दगावतो म्हणजेच डॉक्टरांच्या हालगर्जीपणाचा हा दाखला असून औषधांच्या अतिरिक्त डोज मुळेच संकेतचा मृत्यू झाल्याचे त्याचे वडील किशोर गिरोले व नातेवाईकांचे म्हणणे आहे.संबंधित प्रकारासंदर्भात किशोर गिरोले यांनी बुटी बोरी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असून,पोलिसांनी मर्ग दाखल करून मृत्यू देह उत्तरीय तपासणी करीता नागपूर शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
संकेत याला २८ फेब्रु ला रुग्णालयात भरती केले.तेव्हा रात्री त्याला १०१ डिग्री ताप होता.त्यामुळे त्याला गरजेनुसार उपचार दिले.औषधांचा सकाळी ८:०० वाजता डोज द्यायचे असल्यामुळे रात्री दिलेलेच औषध सकाळी त्याला दिले.परंतु औषध देताच तो बेशुद्ध पडला त्यामुळे त्याला आय सी यु मध्ये दाखल करून मॉनिटर वर घ्यायचे पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
महत्वाची बाब म्हणजे काही कळायचे आताच तो गेल्याने त्याचे मृत्यूचे कारण उत्तरीय तपासणी नंतरच कळेल.
डॉ संगीता देवतळे,माया हॉस्पिटल
बुटीबोरी येथे कुठलेही शासकीय रुग्णालय नाही.त्यामुळे माया हॉस्पिटल मध्ये रुग्णाची नेहमीच गर्दी असते.रुग्णाच्या याच अगतिकतेचा फायदा घेत रुग्णालयाकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल केली जात असल्याचे तेथील काही रुग्णांनी सांगितले.
महत्वाची बाब म्हणजे माया हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार यापूर्वीही अनेकदा झाला असून आताच १५ पूर्वी डॉक्टरांनी रुग्णाला अंगाला लावायचे लोशन पीण्याकरिता दिल्याची घटना घडल्याची माहिती एका रुग्णाने दिली.
Share
& Comment
Tweet