बुटीबोरी पोलिसांची सट्टा माफियावर थातुरमातुर कार्यवाही
#सुचनापत्र देऊन सोडून दिले
बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील इंडोरामा कंपनीच्या गेट क्रं ३ समोर येथील सर्वात मोठा सट्टा माफिया नरेंद्र प्रभाकर निनावे राहणार बुटी बोरी याला दि.१४ मार्च ला सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान सट्टा पट्टी लिहिताना बुटी बोरी MIDC पोलिसांनी रंगेहात पकडले.यावेळी त्यांचेकडून १४६० रुपये नकद राशी जप्त केली.हि कार्यवाही MIDC पोलीस स्टेशन च्या डी बी पथकाचे पोलीस कर्मचारी इकबाल शेख यांनी केली असून.पोलिसांनी निनावे यांचेवर मुंबई जुगार अधिनियम १२ अ अंतर्गत गुन्हा दाखल करून निनावे यांना सुचनापत्र देऊन सोडून दिले.
महत्वाची बाब अशी की,निनावे यांचेवर यापूर्वीही MIDC पोलिस स्टेशन ला अनेकदा गुन्हे दाखल झाले असूनही त्याला अटक का केली नाही हा मात्र चर्चेचा विषय आहे.बुटीबोरी व टाकळघाट परिसरात खूप मोठया प्रमाणात सट्टा व्यवसाय सुरु असून यापासून पोलीस कसे अनभिज्ञ आहे हे कळायला मार्ग नाही.या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय असूनही खूप मोठ्या प्रमाणात सट्टा व्यवसाय चालतो याचा अर्थ पोलिसांना दर महिन्याला त्यांचा वाटा वेळेवर मिळत असल्यामुळेच या सत्तेव्यवसायिकावर कार्यवाही केली जात नाही.परंतु कुणी तक्रार वा जनतेत कुणकुण झाल्यास वरिष्ठांना खुश करण्याकरिता ठातूरमाथुर कार्यवाही केली जाते.

Share
& Comment
Tweet