येथे मरणा नंतरही मिळतात नरकयातना
बुटीबोरी येथे लोकवर्गणीतून स्मशानभूमी सौंदर्यीकरण
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष,ग्रामस्थ व्यथित
स्वराज जनशक्ती फौंडेशन चा उपक्रम/पुढाकार
स्मशानभूमी बांधकाम व सौंदर्यीकरना करीता महाराष्ट्र शासनाच्या जनसुविधा योजनेतून दहा लक्ष रुपये मिळतात.आता हे वाढून पंधरा लक्ष पर्यंत झाले असून स्थानिक ग्रामपंचायत ने पाठविलेल्या प्रस्तावा नुसार शासन निधी उपलब्ध करून देत असते.
आशिया खंडातील सर्वात मोठे पंचतारांकित औधोगिक क्षेत्र असलेल्या बुटीबोरीत सुयोग्य सोयी सुविधा असलेले स्मशान घाट नसल्यामुळे येथे पार्थिव शरीराला मारणानंतरही नरक यातनाच भोगाव्या लागतात. बुटीबोरी हे गाव नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असून शहराला अगदी लागून आहे.येथील लोकसंख्या जवळपास ५० हजाराच्या घरात असून गावात एकच स्मशान घाट आहे.परंतु या एकमेव स्मशानभूमीत सुद्धा समस्यांचा महापूर आहे.येथील नागरिकांना जिवंतपणी तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतोच परंतु मरणा नंतरही मृत आत्म्याला शांती मिळते कि नाही असा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे.या समस्यांचा अंत करण्याचा केविलवाणा प्रयत्न स्वराज्य जनशक्ती फौंडेशन,बुटीबोरी हे लोकवर्गणीतून करीत आहे.
गावाची लोकसंख्या हि इतकी जास्त असल्यामुळे येथे दिवसभरात एकना ना एक तरी मृत पावतो.येथे मृत पार्थिवाला अग्नी देण्याकरिता शेडची व्यवस्था तर केली आहे परंतु मृत शरीराला घाटावर अग्नी देण्याकरिता नेण्याकरिता योग्य रस्ता नसून स्मशान भूमीत नागरिकांना बसण्याची सोय नाही.त्यामुळे अंतीमसंस्कारा करीता जाणाऱ्या नागरिकांची तेथे गैरसोय होत असते.शासनाने स्मशानभूमी करीता जागा व शेड ची व्यवस्था करून दिली होती परंतु तिथे जाण्यासाठी रस्ता,बसण्यासाठी जागा,पाणी व सुरक्षा भिंतीची व्यवस्था नाही.ऋतुमानानुसार उन्हाळ्यात उन्हाचे चटके,तर पावसाळ्यात पाण्याचा मार सहन करीत अंतिम संस्कार पार पडावे लागतात. गाव तिथे स्मशानभूमी अशी जरी शासनाची योजना असली तरी बुटीबोरी येथील निद्रिस्त लोकप्रशासन व उदासीन लोकप्रतिनिधी यांच्या प्रतापामुळे व्यथित ग्रामस्थांनी स्वराज्य जनशक्ती फौंडेशन च्या पुढाकाराने येतील प्रभाग क्रं १,वेना नदी काठावरील स्मशानभूमीत लोकवर्गणीतून स्मशानभूमी सौंदर्यीकरण,सुरक्षा भिंत,लोकांना बसण्याकरिता शेड व खुर्च्या तसेच पार्थिवाला अग्नी देण्याकरिता पुन्हा एक वेगळा शेड तयार करीत आहे
Share
& Comment
Tweet