ओरियंटल कंपनी कडून टोलची मनमानी वसुली
रस्ता दुभाजका मधोमध झाडे लावली नाही,
वाढत्या अपघातावरून ओरियंटल कंपनी वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बुटीबोरी ठाणेदारांना पत्रकार संघाचे निवेदन
नागपूर/०५ फेब्रु:- राष्ट्रीय महामार्ग क्रंमांक ७ वरील
मोहगाव ते डोंगरगाव हा दुरुस्तीच्या वर्गवारीतील मार्ग अतिशय खराब झाला आहे़. त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीकरिता ओरियंटल कंपनीने मार्गावरील गिट्टी महिनाभरापासून उखडली़ परंतु अद्यापही दुरुस्ती केली नाही़ त्यामुळे मागील आठवड्यात अशा लघीनघाईच्या कामामुळे चार मोठे अपघात झाले़ तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहे़.त्यामुळे हा सरळअर्थी कंपनीचा दोष आहे.म्हणून कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बुटीबोरी मराठी पत्रकार संघाने केली आहे़
याबाबत अध्यक्ष जितेंद्र मेश्राम व सरचिटणीस नासिर हुसैन यांनी बुटीबोरी पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांना निवेदन दिले आहे़.
ओरियंटल कंपनीने महाराष्ट्र राज्य सीमेपासून ११७ किमी़च्या रस्त्याचे बांधकाम ३ एप्रिल २०१० ला सुरू करून ते २९ सप्टेंबर २०१२ ला पूर्ण केले़ ज्याच्या बांधकामाची किमत ११७०़.५२ कोटी रुपये इतकी आहे़ त्यात ओरियंटल कंपनी ने या मार्गावर 3 टोल उभारले आहे पण जामठा ते बोरखेडी असा ओरियंटल कंपनीने कोणतेही बांधकाम न करता फक्त मेंटनन्स करिता 22 किलोमीटर साठी मेंटनन्स कंत्राट देण्यात आला तशी बोरखेडी ते जामठा मेंटनन्सची गरज सुद्धा नाही यापूर्वी बोरखेडी ते चिंचभवन या रोड चे काम व त्यात देखभाल- दुरुस्तीचे काम यापूर्वी कंत्राटदार डी़पी़ जैन कस्ट्रक्शंन अॅण्ड कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा़.ली.ने २२ मे २००८ ते २२ मे २०१० पर्यंत बोरखेडी ते चिंचभवन पर्यंत केले़ तेव्हा कुठेही या कामाचा टोल घेण्याची शासना ला गरज भासली नाही परंतु आता मेसर्स ओरियटल बाय पास कन्स्ट्रुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 11 फेब्रुवारी 2013 ते 2 एप्रिल 2037 पर्यंत टोल वसुलीचा कंत्राट मिळाला यापूर्वी डी पी जैन यांनी बोरखेडी ते जामठा ते व जामठा ते चिंचभवन पर्यंत 32 किलोमीटर चे काम केले होते पण आता जामठा ते चिंचभवन पर्यन्तच्या कामावर राष्टीय महामार्ग प्राधिकरण ने कोणताही खर्च केला नाही याउलट बोरखेडी टोल प्लाझावरून बोरखेडी ते जामठा या 22 किलोमीटर करिता 197 कोटी रुपये 24 जुले 2017 पर्यन्त वाहनधारकांकडून वसूल केलेत़ वस्तुत: बोरखेडी ते जामठा मार्ग, अशा २२ किमी़च्या मेन्टनन्सला टोलची गरज असल्याची कोणत्याही पक्षाची व स्थानिक जनतेची मागणी नसतानाही बोरखेडी ला टोल प्लाझा बसविला आहे
ओरियंटल कंपनीच्या कंत्राटा मध्ये या मार्गावरील कोणत्याही प्रकारचे क्रॅक भरणे, मार्गाच्या दोन्ही बाजूचे गवत काढून मुरुम भरणे, कुठेही अपघात झाल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे तसेच करून वाहनधारकांची सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे़ परंतु यातील कुठलेही काम ही कंपनी करीत नसल्याचे म्हणणे संघाने आपल्या निवेदनातून म्हटले आहे़
या बाबत या विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोरखेडी टोल प्लाझा तात्काळ बंद करावा कारण हा टोल प्लाझा फक्त मेंटनन्ससाठी सुरू असल्याने व आतापर्यंत 200 करोड पेक्षाही जास्त पैसे या टोल वरून वसूल झाले व खर्च 5 करोड पण झाले नसतांना हा टोल सुरू आहे ही जनतेची सरासर लूट असल्याने हा बोरखेडी येथील टोल प्लाझा तात्काळ बंद करावा अशी मागणी पण निवेदनातुन कारण्यात आली आहे
Share
& Comment
Tweet