न्यु प्रेरणा कॉन्व्हेण्ट मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता वार्षिक स्नेहसंमेलन आवश्यक असून यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो. विद्यार्थात स्टेज डेअरिंग सह त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकास होण्याकरिता उपयुक्त ठरते.आज घडीला धकाधकीच्या जीवणामुळे आई वडील आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊ शकत नसल्यामुळे विध्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कारीत करणे ही शिक्षकाची जवाबदारी असून शाळा हे आदर्श विध्यार्थी घडविण्याचे भांडरच असल्याचे मत न्यु प्रेरणा कॉन्व्हेंटचे संस्थापक सचिव गणेश सोनटक्के यांनी येथील वार्षिक स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना मांडले.
स्व. नंदू बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित न्यु प्रेरणा कॉन्व्हेण्ट चे वार्षिक स्नेहसंमेलन दि ०८ फेब्रु ला सोनाबाई नगर स्थित प्रेरणा कॉन्व्हेण्ट च्या मोकळ्या भूखंडावर/मैदानावर सायं ६ ते १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.या वेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आ.समीर मेघे,अध्यक्ष म्हणून हिंगणा प स चे उपसभापती हरिश्चंद्र अवचट तर प्रमुख अथीती म्हणून माजी प स उपसभापती आतिष उमरे,ग्रा प टाकळघाट चे उपसरपंच धनपाल भगत, प्रतिष्ठित नागरिक नाना हुसुकले हे प्रामुख्याने हजर होते.
यावेळी शाळेतील पूर्व प्राथमिक ते प्राथमिक इयत्ता ७ वि पर्यंत वर्गातील सर्व विद्यार्थांनी विविध हिंदी मराठी चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली,के जी च्या विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून त्यांनी दिलेले सद्विचार बोलून दाखविले.त्याचप्रमाणे बेटी बचाव;बेटी पढाव,बालविवाह,हुंडाबळी यावर नाटिका सादर करून जनतेला यापासून परावृत्त करण्याचा संदेश दिला.या स्नेहसम्मेलनाला यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापिका रिता चौधरी,पर्यवेक्षिका निर्मला आंबुले,अरविंद बनसोड,रंजना कांबळे,कांचन रहांगडाले,संगीता कोल्हे,प्रीती कळंबे,मीनाक्षी मुस्कुरे,उषा लोखंडे,विना लुटे, श्वेता लोणारे,संध्या रहांगडाले,मनस्वी बावणे,नीलम मेश्राम,सुजाता वानखेडे,श्रद्धा रंगारी,स्वप्ना गजभिये,अमिता रहांगडाले आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Share
& Comment
Tweet